लव्हस्टोरीला सुरूवात..राकेश बापटने शमिताला बेडरूममध्ये केलं किस, Video व्हायरल!

दिवसेंदिवस शमिता आणि राकेश बापटमध्ये दिवसेंदिवस मैत्री वाढत आहे. राकेश बापट शमिता सोबत फ्लर्ट करताना दिसून आला.

    शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस ओटीटीमुळे चर्चेत आली आहे. सध्या शमिता आणि राकेश बापटची केमिस्ट्री सगळ्यांना भावत आहे. अनेकांना शमिताचा परफॉर्मन्स देखील आवडतोय. नुकताच शमिताचा आणि राकेशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत राकेश शमिताला किस करताना दिसतोय.

    दिवसेंदिवस शमिता आणि राकेश बापटमध्ये दिवसेंदिवस मैत्री वाढत आहे. राकेश बापट शमिता सोबत फ्लर्ट करताना दिसून आला. त्यामुळे दोघांमध्. काहीतरी सुरू आहे अशी चर्चा रंगली आहे. आता राकेश आणि शमिताचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत शमिता बेडवर झोपलेली दिसतेय. तर राकेश बापट शमिताच्या हातावर किस करताना दिसतोय.

    बिग बॉस शो म्हटलं की वाद, भांडण आणि प्रेमप्रकरण हे आलचं. या नात्याच्या कायम चर्चा रंगतात. यावेळी शमिता आणि राकेशच्या नात्याची चर्चा रंगली. राकेश बापटने २००१ मध्ये तुम बिन या सिनेमातून करिअरची सुरूवात केली. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये त्याने काम केली आहेत.