ड्रामा क्वीन राखी सावंतचा नवा ड्रीम ड्रामा, म्हणाली सुशांतने स्वप्नात येऊन माझ्या पोटी पुर्नजन्म घेणार असल्याचे केले विधान

राखी सावंत नेहमीच आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेच असते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकजण सुशांतबद्दलची आपली मते व्यक्त करत आहेत. अशातच राखी सावंतने पुन्हा एकदा एक विचित्र विधान केले

 राखी सावंत नेहमीच आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेच असते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकजण सुशांतबद्दलची आपली मते व्यक्त करत आहेत. अशातच राखी सावंतने पुन्हा एकदा एक विचित्र विधान केले आहे. सुशांत आपल्या स्वप्नात आल्याचे तिने म्हटले आहे.

राखीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राखीने सांगितले आहे की, मी रात्री झोपले असताना सुशांत सिंह राजपूत माझ्या स्वप्नात आला होता. त्याने मी तुझ्यापोटी पुर्नजन्म घेणार असे सांगितले. त्यावर मी त्याला हे कसं शक्य आहे, हे विचारलं. त्यानंतर त्याने तू लग्न कर मग मी तुझ्या पोटी जन्म घेईन, असे म्हटले. हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली. राखीला परिस्थितीचे भान नाही असे म्हणत अनेकजण तिच्यावर चिडले. अनेकांनी तिला ट्रोल केले. राखी सावंतच्या अशा वक्तव्यामुळे तिला ड्रामा क्वीन म्हटले जाते. आता तिचा हा ड्रीम ड्रामा चांगचाल चर्चेच आहे.