rakhi sawant

राखी सावंत नव्या अवतारात दिसली आहे. ती चक्क मस्तानीसारखा ड्रेस घालून फिरली आहे. तिचा मस्तानी अवतारातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल(Rakhee Sawant Viral Video) झाला आहे.

  राखी सावंत(Rakhee sawant) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. राखीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होताना दिसतात. कधी ती एकदम भन्नाट कपडे घालून फिरते. कधी भाजी घ्यायला जाताना ती पीपीई किट घालून जाते. आता राखी सावंत नव्या अवतारात दिसली आहे. ती चक्क मस्तानीसारखा ड्रेस घालून फिरली आहे. तिचा मस्तानी अवतारातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल(Rakhee Sawant Viral Video) झाला आहे.

  View this post on Instagram

   

  A post shared by The Khabri (@realthekhabri)

  राखीचा हा व्हिडिओ द खबरी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राखीने मस्तानीचा(Mastani) पोशाख परिधान केल्याचे दिसत आहे. तसेच राखी रस्त्यावर फिरत आहे.  या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, राखी रस्त्यावर फिरताना मी माझं प्रेम शोधत असल्याचं सांगत आहे.

  राखीने असही म्हटलं आहे. “ना व्हॅक्सिन मिळत आहे, ना कपड्यांचं दुकानं सुरू होत आहे. त्यामुळे मी भटकत आहे, ना मुंबई उघडतेय, ना लॉकडाऊन हटतोय, मी खूप चिंतेत आहे. ना मी ‘खतरों के खिलाडी’ मध्ये जाऊ शकले, ना मी विवाहीत असून मला माझा पती मिळाला. एक चान्स होता मला माझ्या नवऱ्याला भेटायचा ‘नच बलिए’मध्ये तो शो ही आता बंद होत आहे. आता मी माझ्या नवऱ्याला कशी भेटू. तुम्ही मला मीरा बोला किंवा मस्तानी मी माझ्या बाजीरावला शोधत आहे.”