ड्रामा क्वीन राखी सावंत वर येतोय बायोपिक, ही अभिनेत्री साकारणार मुख्य भुमिका, तर राखीने दिले आणखी दोन अभिनेत्रींची नावं!

राखी सावंत म्हणाली, ‘काही वर्षांपूर्वी आम्ही एकत्र प्रवास करत होतो आणि एका विमानात भेटलो होतो. जावेद सर मला म्हणाले की, त्यांना माझ्या जीवनावर बायोपिक लिहायचा आहे, ते मी कसा संघर्ष केला आणि इथपर्यंत पोहचले त्यावर लिहिणार आहेत.

  अभिनेत्री राखी सावंतने आपण बायोपिक बनवार असल्याचं जाहीर केलं. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. ज्येष्ठ गीतकार लेखक जावेद अख्तर यांना तिचा बायोपिक चित्रपट बनवायचा आहे, असे राखी म्हणाली होती. इतकेच नाही तर, नंतर जावेद अख्तर यांनी राखीचे विधान खरे असल्याची पुष्टी केली. आता राखीने या चित्रपटात स्वतःची भूमिका आलिया, प्रियांका किंवा राधिका अपटेने साकारावी असं म्हटलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

  राखी सावंत म्हणाली, ‘काही वर्षांपूर्वी आम्ही एकत्र प्रवास करत होतो आणि एका विमानात भेटलो होतो. जावेद सर मला म्हणाले की, त्यांना माझ्या जीवनावर बायोपिक लिहायचा आहे, ते मी कसा संघर्ष केला आणि इथपर्यंत पोहचले त्यावर लिहिणार आहेत. राखी म्हणाली, ‘आता मला वाटतं त्यांना वेळ मिळाला आहे आणि जर त्यांना काही वेळ मिळाला असेल, तर ते नक्कीच ही कथा लिहीतील.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

  त्याचबरोबर राखी पुढे म्हणाली  ‘मला असे वाटते की माझ्या भूमिकेला न्याय मिळवून देणाऱ्या २-३ अभिनेत्री आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट हिचा यात पहिला क्रमांक आहे. मला वाटते ती हुशार आहे. ती बोल्ड आणि मस्त आहे आणि ती कोणालाही घाबरत नाही. त्याच्या व्यतिरिक्त प्रियंका चोप्रा देखील मला या भूमिकेसाठी योग्य वाटते. ती माझी भूमिका साकारू शकते.