अख्ख बॉलिवूड राज कुंद्राच्या विरोधात गेलं असतानाच ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंतला आला त्याचा पुळका, म्हणाली…

राज कुंद्राच्या विरोधात बॉलिवूडमधून अनेक प्रतिक्रीया आल्या मात्र बॉलिवूडची ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंतने राज कुंद्राची बाजू घेतली आहे.

  अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. राज कुंद्राला न्यायालयात हजर केल्यानंतर २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या विरोधात बॉलिवूडमधून अनेक प्रतिक्रीया आल्या मात्र बॉलिवूडची ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंतने राज कुंद्राची बाजू घेतली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  राखी सावंत म्हणाली, “शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे…तिचं नाव खराब करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत… राज कुंद्रा एक उत्तम व्यक्ती आहेत…त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.” राज कुंद्रा असं काही करू शकतो यावर विश्वासच बसत नाही, असं देखील यावेळी राखी सावंतने म्हटलंय.

  शिल्पाचं ही केलं कौतुक

  राखी सावंतने शिल्पा शेट्टीचं भरपूर कौतुक केलं. यावेळी राखी सावंत म्हणाली, “मला आठवतंय…राकेश रोशन यांचं ‘क्रेझी 4’ मधलं ‘तुझे टुक देखे’ या आयटम साँगसाठी सुरूवातीला शिल्पा शेट्टीवा ऑफर आली होती. जेव्हा तिने मला सांगितलं की गाणं तिला नाही करायचंय. त्यावेळी ते गाणं मला देण्यासाठी सांगितलं. त्यानंतर शिल्पा शेट्टीने राकेश रोशन यांना माझं नाव सुचवलं. ”