राखी सावंतने सांगितलं Bigg Boss च्या घरातलं सिक्रेट, म्हणाली ‘हा’ स्पर्धकच राहू शकतो शेवटपर्यंत घरात!

'शमिता व राकेश हे सर्वात कमकुवत कनेक्‍शन आहे, तर निशांत-मूस व प्रतिक-अक्षरा हे प्रबळ कनेक्‍शन्‍स आहेत. शमिता-राकेशने त्‍यांचे प्रेम सर्वांसमोर आणावे'.

    एक व्‍यक्‍ती निश्चितच टेलिव्हिजन क्षेत्रातील ओव्‍हर-दि-टॉप मनोरंजनाला परिभाषित करते, ती म्‍हणजे राखी सावंत. बिग बॉसची पहिली पत्‍नी म्‍हणून त्‍याच्‍यावर प्रेमाचा वर्षाव करायचो असो, ज्‍युलीमध्‍ये बदललेले तिचे रूप असो किंवा बिग बॉस ओटीटी घरामध्‍ये प्रवेश मिळवण्‍यासाठी स्‍पायडरवुमनसारखा पोशाख परिधान करायचा असो, तिने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यासाठी सर्व सीमा पार केल्‍या आहेत. इंडस्‍ट्रीमधील विलक्षण मनोरंजन दिवा असलेली राखी सावंत नीडरपणे जगासमोर तिचे मत व्‍यक्‍त करते. बिग बॉसची निस्‍सीम समर्थक असलेल्‍या राखीने बिग बॉस ओटीटी स्‍पर्धकांबाबत तिचे मत व्‍यक्‍त केले आहे… याबाबत पुढे अधिक जाणून घ्‍या!

    घरामधील सर्वात कमकुवत कनेक्‍शन्‍स आणि सर्वात प्रबळ कनेक्‍शन्‍सबाबत विचारले असताना राखी सकारात्‍मकपणे प्रतिसाद देत म्‍हणाली, ”माझ्यामते घरामध्‍ये निशांत भट – मूस आणि प्रतिक सहेजपल – अक्षरा सिंग हे सर्वात प्रबळ कनेक्‍शन्‍स आहेत. ते नेहमीच एकमेकांना पाठिंबा देतात आणि गरजेच्‍या वेळी जोडीदाराच्‍या मागे खंबीरपणे उभे राहतात. त्‍यांना पडद्यावर पाहताना खूपच चांगले वाटते. शमिता शेट्टी – राकेश बापट हे घरातील सर्वात कमकुवत कनेक्‍शन आहे, पण त्‍यांच्‍यामधील केमिस्‍ट्री खूपच छान असल्‍यामुळे त्‍यांनी त्‍यांच्‍यामधील प्रेम समोर आणले तर ते सर्वात प्रबळ कनेक्‍शन बनू शकतात.”

    अधिक पुढे जात, राखी सावंतने मिलिंद गाबाच्‍या गेमबाबत तिचे मत व्‍यक्‍त केले. ती म्‍हणाली, ”मिलिंद गाबा हा पहिल्‍या सीझनमधील राहुल रॉय सारखा आहे, कोप-यात शांत राहत गेम खेळेल. पण बिग बॉसचा तिसरा डोळा आहे ना, तो सर्वकाही बघत आहे.” ती शेवटी म्‍हणाली की, ”घरात जो एंटरटेनर असणार तोच राहणार.”