‘महाराष्ट्राला नजर लागली आहे’ असं म्हणत राखी सावंतने कोरोनावर सांगितला मजेशीर उपाय, VIDEO तुफान व्हायरल!

 त्याचबरोबर विकी कौशलला देखील कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं तेव्हा राखीला धक्काच बसला. कारण राखी आणि विकी एकाच जिममध्ये जातात. त्यानंतर राखीने विक्कीबद्दल चिंता व्यक्त केली तसचं. त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थनादेखील केली.

  ड्रामा क्विन राखी सावंत कायम चर्चेत असते. ती नेमहमीच प्रेक्षकांच मनोरंजन करत असते. नुकतच राखीला जिममधून निघताना पापाराजीने स्पॉट केलं. यावेळी राखीने मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी फोटोग्राफर्सनी राखीला बॉलिवूडमधील वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर प्रश्न विचारला. यावेळी राखीने नेहमीप्रमाणेच हटके उत्तर दिलं.

  View this post on Instagram

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओत राखीने कोरोनाच्या संसर्गावर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय. यात राखी म्हणाली आहे, “आपल्या महाराष्ट्राला नजर लागली आहे, त्याचप्रमाणे अनेक जण कोव्हीडचे बनावट सर्टिफिकेट काढत आहेत. जर लोकांनी असं करणं बंद केलं तर कोरोनाचं प्रमाण कमी होईल.

  View this post on Instagram

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  लोक विमानाने प्रवास करतात. ८००- १२०० रुपये वाचवण्यासाठी ते कोव्हिडचं खोटं सर्टिफिकेट दाखवतात आणि म्हणतात त्यांची कोरोना चाचणी झाली आहे. आजुबाजुला जे कोणी असे खोटे लोकं आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करते की बनावट सर्टिफिकेट दाखवणं बंद करा आणि २४ तास मास्कचा वापर करा. ” असं राखी म्हणाली आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)