लस घेतानाचा राखी सावंतने गायलं गाणं, हा धम्माल Video सोशल मीडियावर होतोय व्हायरल!

व्हिडीओमध्ये राखी सांगते की, ‘तेरे ड्रीम में मेरी एण्ट्री’ हे तिचे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  ड्रामा क्वीन राखी सावंत दररोज तिच्या विचित्र व्हिडिओ आणि फोटोमुळे चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वी राखी बिग बॉस १४ मध्ये दिसली होती. यावेळी तीने भरभरून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. राखीचे व्हिडिओ बघून तिचं हे वागणे पाहून सर्वांना हसू अनावर होते. आता राखीचा कोरोना लस घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

  राखीने स्वत: इन्स्टाग्राम अकाऊंटवर लस घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. लस घेताना राखी घाबरली असल्याचे दिसत आहे. ती ‘मी एक गाणे गाऊ का?’ असे बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये राखी सांगते की, ‘तेरे ड्रीम में मेरी एण्ट्री’ हे तिचे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  राखीने व्हिडीओ शेअर करत ‘मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता तुम्ही माझ्या आगामी व्हिडीओची वाट पाहा’ असे कॅप्शन दिले आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. विंदु दारा सिंह यांनी राखीच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. एका यूजरने कमेंट करत ‘तू प्रत्येक परिस्थितीमध्ये कमाल करतेस’ असे म्हटले आहे.