भररस्त्यात रिक्षेवाल्या काकांसोबत राखीचा धम्माल डान्स, Video होतोय तुफान व्हायरल!

राखीचा हा नवा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये राखी एका रिक्षाचालकाला चक्क डान्स स्टेप शिकवताना दिसून येत आहे.

  ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच तिच्या हटके अंदाजामुळे चर्चेत येत असते. राखी नेहमीच आपल्या व्हिडिओमुळे सगळ्यांच लक्ष वेधून घेते. अनेक वेळा ती ट्रोल देखील होते. मात्र या सगळ्याचा राखीवर काहीच फरक पडत नाही. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी सावंतने चक्क रस्त्यावर एका रिक्षाचालकाला डान्स करायला भाग पाडलं आहे. राखी त्यांना डान्सच्या स्टेप्सही शिकवताना दिसतेय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

  राखीचा हा नवा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये राखी एका रिक्षाचालकाला चक्क डान्स स्टेप शिकवताना दिसून येत आहे. यामध्ये ती आपल्या एका नव्या गाण्याच्या स्टेप त्यांना शिकवत आहे.

  काही दिवसांपूर्वीच राखी बिग बॉस 14 मध्ये सहभागी झाली होती. त्यामध्ये सुद्द्धा ती अशाच आपल्या आगळ्यावेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत आली होती. बिग बॉसमध्ये ती मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचं आणि घरातील स्पर्धकांचंदेखील मनोरंजन करत होती.