‘वेडेपणा वाढत चाललाय…’ स्पायडर वुमनचा ड्रेस परिधान करून राखी सावतं रस्त्यात चक्क झोपली, नाचली आणि…

राखी स्पायडर वुमनचा ड्रेस घालून रस्त्यावर नाचताना, झोपताना दिसतेय. या व्हिडिओत राखीने स्पायडरमॅनसारखे कपडे परिधान केले आहेत.

  सतत चित्रविचित्र प्रकारामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती काहीना काही करून राखी चाहत्यांच मनोरंजन करत असते. राखी सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सतत काहीना काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच मनोरंजन करते. सध्या राखीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  यात राखीने स्पायडर वुमनचा ड्रेस परिधान केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  राखी स्पायडर वुमनचा ड्रेस घालून रस्त्यावर नाचताना, झोपताना दिसतेय. या व्हिडिओत राखीने स्पायडरमॅनसारखे कपडे परिधान केले आहेत. राखीने या ड्रेसवर लाल रंगाचा टीळा लावला आहे. आणि गळ्यात जाड गोल्डन चेन घातल्या आहेत. त्यानंतर राखी रस्त्यावर झोपते आणि बिग बॉसच्या घरात एन्ट्री द्यायला सांगते.

  हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न राखीला विचारले आहेत. काहींनी राखीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. एका यूजरने ‘तुला वेड लागले आहे का?’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हे सगळं तू काय करते आहेस? संपूर्ण भारत विचारत आहे’ असे म्हटले आहे. तर काहींनी तुझा वेडेपणा वाढत चाललाय असं म्हणत राखीला ट्रोल केलं.