rakhi sawant

'लग्नाच्या दिवशीच माझा पती रितेश मला सोडून गेला आणि परत कधीच आला नाही', असा खुलासाच राखीनं बिग बॉसच्या घरात केला होता. आता राखीच्या आईनं देखील राखीचं लग्न झालं असून जावई खूप चांगला असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता राखीचा पती रितेश बिग बॉसच्या घरात कधी येणार याची वाट पहात आहेत.

सध्या बिग बॉस १४ वं पर्व खूप गाजत आहे आणि त्याला कारणही तसच आहे कारण बॉलिवूड अभिनेत्री, आयटम गर्ल राखी सावंत सध्या बिग बॉसच्या घरात आहे. आता राखी घरात आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच. बिग बॉसच्या घरातील राखीचे किस्से तर चर्चेत असतातच. परंतु तिच्या खासगी आयुष्याबद्दलही गॉसिप सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

घरात चर्चा रंगते ती राखीच्या लग्नाची. काही महिन्यांपूर्वी राखीनं लग्न केल्याचं जाहीर केलं होतं. परंतु अद्यापही तिचा पती नेमका आहे तरी कोण? या प्रश्नाचं उत्तर कोणालाच मिळालं नाही. पण एका मुलाखतीत राखीच्या आईनं राखीच्या पतीचं कौतुक केलय.

राखी सावंतच्या आईला कर्करोग असल्याचं निदान झालं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी राखी आणि जावयाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ‘ रितेश खूप चांगला माणूस आहे. मी हॉस्पिटलमध्ये असताना त्यानं अनेकदा विचारपूस केली. हॉस्पिटलचं बिल देखील त्यानं भरलं आहे. मी त्याला सर्वांसमोर येण्याची विनंती केली आहे. त्यानं देखील मला शब्द दिलाय. तो बिग बॉसच्या मंचावर सर्वांसमोर येईल आणि राखीचा स्विकार करणार आहे’, असं राखीची आई जया यांनी म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

‘लग्नाच्या दिवशीच माझा पती रितेश मला सोडून गेला आणि परत कधीच आला नाही’, असा खुलासाच राखीनं बिग बॉसच्या घरात केला होता. आता राखीच्या आईनं देखील राखीचं लग्न झालं असून जावई खूप चांगला असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता राखीचा पती रितेश बिग बॉसच्या घरात कधी येणार याची वाट पहात आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)