ram gopal varma

महासंघाचे अध्यक्ष बीएन तिवारी, सरचिटणीस अशोक दुबे आणि कोषाध्यक्ष गंगेश्वरलाल श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी राम गोपाल वर्मा यांना या संदर्भात कायदेशीर नोटीस पाठविली आहे. परंतु राम गोपाल वर्मा यांनी नोटीसीला कोणतेही उत्तर दिले नाही. १७  सप्टेंबर २०२० ला राम गोपाल वर्मा यांना एफडब्लूआइसीई एक पत्र लिहिले होते. ज्यात कुठल्या कामगाराचे किता पैसे या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली होती.

निर्माता, दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या विरोधात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयजने एका बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या फेडरेशनच्या ३२ संघटनांपैकी कोणतीही संघटना यापुढे राम गोपार वर्माबरोबक देशामध्ये कुठल्याही भागात काम करणार नाही. कारण राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाशी संबंधित कलाकार, टेक्नीशियन आणि कामगारांची सुमारे १.२५  कोटी रुपयांची थकबाकी दिली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by RGV (@rgvzoomin)

महासंघाचे अध्यक्ष बीएन तिवारी, सरचिटणीस अशोक दुबे आणि कोषाध्यक्ष गंगेश्वरलाल श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी राम गोपाल वर्मा यांना या संदर्भात कायदेशीर नोटीस पाठविली आहे. परंतु राम गोपाल वर्मा यांनी नोटीसीला कोणतेही उत्तर दिले नाही. १७  सप्टेंबर २०२० ला राम गोपाल वर्मा यांना एफडब्लूआइसीई एक पत्र लिहिले होते. ज्यात कुठल्या कामगाराचे किता पैसे या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली होती. तसेच एफडब्लूआइसीई संघटनेने या संदर्भात राम गोपाल वर्मा यांना अनेक वेळा पत्र लिहिले होते मात्र, त्यांनी ते पत्र घेण्यासही नकार दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by RGV (@rgvzoomin)

 

राम गोपाल वर्मा यांनी गरीब टेक्नीशियन, कलाकार आणि कामगार यांची थकबाकी द्यावी, ते टाळाटाळ करीत आहेत. अशी मागणी या संघटनेनं केली आहे.  राम गोपाल वर्मा यांनी सत्या, रंगीला, राम गोपाल वर्मा की आग, कंपनी, सरकार, निःशब्द,भूत, दौड़ या सारखे हिट चित्रपट तयार केले आहेत.