ram gopal varma

याचं नाव स्पार्क ओटीटी असं आहे. कुठलाही गाजावाजा न करता १५ मे रोजी रामूनं स्वत:चाच 'डी' हा पहिला चित्रपट रिलीज करून स्पार्कचा शुभमुहूर्त केला आहे.

    फिल्ममेकर रामगोपाल वर्मानं नेहमीच काहीतरी हटके काम करत प्रेक्षकांना अनपेक्षित धक्के दिले आहेत. मग ते चित्रपटांच्या माध्यमातून असोत, वा आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून… चर्चेत राहणं हा रामूचा स्थायीभाव असल्याचं आता सर्वांनाच समजलं आहे. आजची काळाची गरज ओळखून रामूनं थेट ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केलं आहेत.

     आज जिथे मोठमोठे फिल्ममेकर्स अमेझॉन, नेटफ्लीक्स, जिओ सिनेमा, वूट, सोनी लिव्ह, झी५, अल्ट बालाजी या भारतातील अग्रगण्य ओटीटींवर आपले चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत तिथं रामूनं स्वत:च ओटीटी थेट सुरू केलं आहे. याचं नाव स्पार्क ओटीटी असं आहे. कुठलाही गाजावाजा न करता १५ मे रोजी रामूनं स्वत:चाच ‘डी’ हा पहिला चित्रपट रिलीज करून स्पार्कचा शुभमुहूर्त केला आहे.

    ओटीटी हे आजच्या काळाचं माध्यम असल्याचं मानत रामूनं भविष्यात ८० ते ९० टक्के चित्रपट थेट इथेच रिलीज होणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. ओटीटीमुळं प्रेक्षकांचा वेळही वाचेल आणि आपल्याला हवं ते मनोरंजन निवडण्याचा हक्कही त्यांच्याकडे राहील असंही रामूचं मत आहे.