ram kadam -saif

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. ‘आदिपुरुष’ असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट रामायण या पौराणिक कथेवर आधारीत आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. या चित्रपटात रावणाची मानवीय बाजू दाखवण्यात येईल अशी घोषणा सैफ अली खानने केली आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे सैफवर सध्या चहूबाजूने टीका होत आहे.

राम कदम यांची सैफवर टीका

राम कदम यांनी ट्वीट करत सैफ अली खानवर टीका केलीये. ट्वीटमध्ये ते म्हणाले आहेत. सैफ अली खान रावण याची नायिका साकारण्याविषयी बोलतोय. पण रावणाच्या गैरप्रकरांना तो कशाप्रकारे न्याय देणार आहे? हे कसं शक्य आहे. ज्याप्रमाणे ओम राऊत यांनी हिंदूंचा आदर करणारी तानाजी ही फिल्म बनवली होती त्याचप्रमाणे त्यांनी हा चित्रपट बनवावा. तशाच प्रकारे या चित्रपटातही हिंदूंच्या श्रद्धा आणि श्रद्धेचा आदर केला पाहिजे.

काय म्हणाला सैफ

सैफ अली खान या चित्रपटात लंकेश अर्थात रावणाची भूमिका साकारणार आहे.  एका मुलाखतीत सैफने या भूमिके विषयी मत मांडलं आहे. तो म्हणाला, रावणाला केवळ आपण खलनायकाच्या भूमिकेतून पाहिलं आहे. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता? याचं चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रावणानं भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केलं हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याला देखील एक पार्श्वभूमी होती. रामाचे भाऊ लक्ष्मण यांनी सुर्पनखाचं नाक कापलं होतं. त्यानंतर हे युद्ध होणारच होतं. या चित्रपटात रावणची विचारसरणी काय होती हे दाखवलं जाणार आहे.”

View this post on Instagram

A post shared by Saif Ali Khan (@actorsaifalikhan)

आदिपुरूषची तगडी स्टार कास्ट

२०२२मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेता प्रभास राम यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास ४०० कोटी रुपयांचं बजेट ठरवण्यात आलं आहे. युद्धाचे प्रसंग अधिकाधिक आकर्षक दिसावे यासाठी अमेरिकेतील काही खास तज्ञांची मदत घेतली जाणार आहे

View this post on Instagram

A post shared by Om Raut (@omraut)

View this post on Instagram

A post shared by Om Raut (@omraut)