जॅकलीन, नुसरत भरूचाबरोबर अक्षय कुमारने गाठली ‘या’ कारणासाठी अयोध्या, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती!

‘राम सेतू’ सिनेमाच्या मुहूर्त शॉटसाठी अक्षयने त्याच्या टीमसह अयोध्या गाठली आहे. “स्पेशल फिल्म.. स्पेशल सुरुवात.. राम सेतू सिनेमाची टीम मूहर्त शॉर्टसाठी आयोध्येला रवाना झाली आहे. आणि प्रवास सुरू झालाय. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची गरज आहे.” असं ट्विट अक्षयने केलं आहे.

    अभिनेता अक्षय कुमार त्याच्या राम सेतू या चित्रपटामुळे गेले काही दिवस प्रचंड चर्चेत आला आहे. या सिनेमाच्या शूटिंगचा श्रीगणेशा करण्यासाठी अक्षय कुमार अयोध्येला रवाना झालाय. त्याच्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा या दोघीदेखील अयोध्येला गेल्या आहेत. अक्षय कुमारने त्याचे फोटो सोसल मीडियावर शेअर केले आहेत.

    ‘राम सेतू’ सिनेमाच्या मुहूर्त शॉटसाठी अक्षयने त्याच्या टीमसह अयोध्या गाठली आहे. “स्पेशल फिल्म.. स्पेशल सुरुवात.. राम सेतू सिनेमाची टीम मूहर्त शॉर्टसाठी आयोध्येला रवाना झाली आहे. आणि प्रवास सुरू झालाय. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची गरज आहे.” असं ट्विट अक्षयने केलं आहे.

    अभिषेक शर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचं ८० टक्के शूटिंग मुंबईमध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या सिनेमात अक्षयचा लूक काहीसा वेगळाच असणार आहे असंही ते म्हणाले. अक्षयची भूमिका ही एका पुरातत्व शास्त्रज्ञाची असेल. तर जॅकलीन आणि नुसरत भरूचा यांच्या मुख्य भूमिका चित्रपटात आहेत.