‘हे नृत्य प्लीज व्हायरल करा’, रामायणावरील ते नृत्यबघून शिल्पाने केलं अवाहन!

अनेक व्यक्तिरेखा आणि विविध भावना एकाच परफॉर्मन्समध्ये स्टेजवर सादर केल्याबद्दल तीन डान्सरचं कौतुक केलं.

    प्रतीती आणि श्वेता या ‘सुपर डान्सर ४’मधील जोडीनं लक्षवेधी डान्स करत सर्वांना मोहित केलं आहे. प्रतीती आणि श्वेता आता ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ स्पर्धेतील माजी स्पर्धक साधवी मजुमदारच्या साथीनं रामायणातील अॅक्ट सादर करणार आहेत. हिंदू धर्मातील पुराणतील रामायणातील कथेची नृत्याशी सांगड घालत राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघताना, लक्ष्मण शूर्पणखाचं नाक कापताना, रावणाकडून सीतेचं अपहरण, रामाकडून रावणाचा वध आणि अयोध्येत राम, लक्ष्मण, सीता यांचं पुनरागमनावर आधारीत नृत्य सादर करणार आहेत.

    मूळ सांस्कृतिक ‘नृत्य नाटिके’च्या माध्यमातून सांगण्यात आलेली ही कथा सर्वांनाच प्रभावित करणार आहे. आकर्षक, सृजनात्मक नृत्यदिग्दर्शन आणि सुंदरपणे पार पाडलेल्या एकूणच या परफॉर्मन्समुळं परीक्षक आणि विशेष पाहुणे बादशहानं उभे राहून सलामी, शिडीची सलामी दिली आणि हे व्हायरल आणि ग्लोबल होण्याची इच्छा व्यक्त केली. रामायणातील ‘तीन देवियाँ’ हे प्रमुख कथानक पाहताना भारावून गेलेल्या गीता माँनं शोच्या चार सिझनमधील ‘सर्वात दैवी अॅक्ट’ असं संबोधलं. अनेक व्यक्तिरेखा आणि विविध भावना एकाच परफॉर्मन्समध्ये स्टेजवर सादर केल्याबद्दल तीन डान्सरचं कौतुक केलं.

    या अॅक्टमुळं शिल्पा खूप भावूक झाली आणि तिनं लोकांना आवाहन केलं की, हा अॅक्ट प्लीज.. प्लीज व्हायरल करा. नव्या पिढीसाठी विशेषत: लहान मुलांसाठी हा अॅक्ट प्रत्येकाकडं शेअर झाला पाहिजे. मुलांनी हे पहायला हवं, हे खरोखर सांगतं. हे खूपच सुंदर आहे.