‘रामायण’ पाठोपाठ आता ‘या’ वाहिनीवर प्रसारीत होणार ‘महाभारत’!

या मालिकेमुळे लोकांना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन मिळतो. आजच्या या कोरोना महामारीच्या कठीण दिवसांत ही महामालिका महत्त्वाची आहे. म्हणूनच स्टार भारत वाहिनीने स्वस्तिक प्रॉडक्शन निर्मित २०१३ साली गाजलेली मालिका पुन्हा एकदा प्रसारीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

    महाभारत’ हे मानव जातीसाठी सर्वात मोठे महाकाव्य आहे. यात केवळ एका महान युद्धाचीच कथा नसून एक मार्गदर्शक ज्ञानही त्यातून मिळते. कारण त्यात हिंदू धर्माचे सार पाहायला मिळते. या मालिकेमुळे लोकांना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन मिळतो. आजच्या या कोरोना महामारीच्या कठीण दिवसांत ही महामालिका महत्त्वाची आहे. म्हणूनच स्टार भारत वाहिनीने स्वस्तिक प्रॉडक्शन निर्मित २०१३ साली गाजलेली मालिका पुन्हा एकदा प्रसारीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सौरभ जैन (भगवान कृष्ण), पूजा शर्मा (द्रौपदी), सायंतनी घोष (सत्यवती), शहीर शेख (अर्जुन), अर्पित रांका (दुर्योधन), प्रणीत भट्ट (शकुनी), पुनीत इस्सर (परशुराम) हे सर्व दिग्गज अभिनेते सिद्धार्थकुमार तिवारी यांच्या ‘महाभारत’ मालिकेत दिसतात. निर्मात्यांनी नेहमीच भव्यता, वीएफएक्स, महान कथानक, महागडे सेट्स, सुंदर लोकेशन्स, मनोहारी दृश्ये, प्रसिद्ध कलाकार आपल्या मालिकेसाठी वापरले आहेत.

    ‘महाभारत’ हे महाकाव्य आणि त्याचे कथानक आजच्या काळात प्रासंगिकच आहे. या मालिकेमुळे केवळ कोरोनाशी लढायला ताकद आणि आशा मिळावी हाच ही मालिका पुन्हा दाखवण्यामागे उद्देश्य आहे. आता घडणाऱ्या घटनांसाठी ‘महाभारता’त अनेक दृष्टांत पाहायला मिळतील. त्यामुळे या कठीण काळात प्रेक्षकांमध्ये साहस वाढविण्यासाठी आणि त्यांचे भरपूर मनोरंजन करण्यासाठी ही मालिका आणल्याबद्दल स्टार भारतचे आभारच मानायला हवेत.