‘आमीर खानविरूद्ध मोर्चा काढ’, रामदेव बाबांनी ‘तो’ जूना VIDEO शेअर करत ओढलं वादात!

बाबा रामदेव यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून आमीर खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरूद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच रामदेव बाबा यांनी दिलं आहे.

    योगगुरू रामदेव बाबा यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली. या वादानंतर कोणी बाबांची साथ दिली तर कोणी विरोधात उडी घेतली. तर या वादात बाबा रामदेव यांनी आमिर खानला ओढून घेतलं आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढला आहे.

    बाबा रामदेव यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून आमीर खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरूद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच रामदेव बाबा यांनी दिलं आहे. या व्हिडिओमध्ये आमीरने देशातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांसोबत चर्चा केली आहे. त्यामध्ये, वैद्यकीय क्षेत्रातील औषधांच्या किंमतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. वास्तविक किंमतींच्या ५० पट अधिक दराने ही औषधे विकली जात असल्याचा आरोप या व्हिडिओत केला आहे.

    साध्वी प्राची बाबांच्या बाजूने

    “आयएमएच्या माध्यमातून १९२८ मध्ये एक एनजीओ तयार केली होती. भारतात मदर तेरेसा नावाची एक जादूगार होती, जी लोकांना स्पर्श करूनच बरं करायची. त्यांचा मृत्यूही रुग्णालयात झाला होता” असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे. तसेच “बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना बरं केलं आहे. आयएमएच्या लोकांनो लक्ष देऊन ऐका, वाटीभर पाण्यात बुडून मरा. लाज वाटू द्या. आयुर्वेदावर चिखलफेक करणाऱ्यांनो नीट ऐका, बाबा रामदेव देशासाठी खूप मोठं कार्य करत आहेत. ते कोट्यवधी लोकांना बरं करत आहेत” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

    बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.