ram gopal varma

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्माने(Ram Gopal Varma Tweet Viral) केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

    दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनीचा मुलगा नागाचैतन्य आणि अभिनेत्री समांथा(Samantha And Nagachaitanya Divorce) यांनी घटस्फोट घेतल्याचे सोशल मीडिया(Social Media) पोस्टद्वारे सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. अशातच चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्माने(Ram Gopal Varma Tweet Viral) केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

    राम गोपाल वर्मा यांनी केलेले ट्विट हे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. ‘लग्नगाठी या नरकात बांधलेल्या असतात तर घटस्फोट हे स्वर्गातच ठरलेले असतात’, असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केले आहे.

    समांथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.  समांना आणि नागा चैतन्यने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की,“आमच्या सगळ्या हितचिंतकांसाठी, बराच विचार केल्यानंतर मी आणि चै(नागा चैतन्य)ने पती-पत्नीच्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १० वर्षांपासून आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिण आहोत आणि आमच्यात असलेल हे नात कायम राहिलं. आम्ही आमच्या चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती करतो की या कठीण काळात ते आम्हाला पाठिंबा देतील आणि आम्हाला प्रायव्हसी द्याल. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.”