बाहुबलीचा भल्लालदेव साकारताना राणाने घेतली प्रचंड मेहनत, एका दिवसात ४० अंडी आणि ८वेळा करायचा जेवण

साऊथचा सुपरस्टार राणा दग्गुबाती आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. आज पर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. साऊथबरोबर बॉलिवूडच्या चित्रपटातही तो झळकला. पण त्याला सर्वाधिक ओळख मिळाली ती बाहुबलीच्या भल्लदेवाच्या भूमिकेमुळे. त्याची भल्लदेवाची भूमिका आजही लोकांच्या मनात आहे. प्रभास इतकचं महत्त्व राणाच्या भूमिकेला या चित्रपटात होतं.

View this post on Instagram

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati)

अशी तयारी केली भल्लालदेवाची

भल्लालदेव बनण्यासाठी राणाने फार मेहनत घेतली होती. भल्लालदेवाच्या भूमिकेसाठी राणाला रोज ४ हजार कॅलरीज घ्यावा लागत होत्या. यासाठी दररोज राणा ४० अंडी खात होता. त्यासोबतच जिममध्ये ८ तास घालवत होता. सर्वसामान्यमाणूस दिवसातून २ वेळा जेवतो. पण राणा या भूमिकेसाठी दर दोन तासांनी म्हणजे दिवसातून ८ वेळा जेवायचा. दर दोन तासांनी तो भात खायचा. या भूमिकेसाठी त्याला १०० किलो वजन वाढवायचं होतं. इतकं वजन वाढवल्यावर पोट बाहेर येऊ नये म्हणून तो राणाने खूप मेहनत घेतलीय.

View this post on Instagram

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati)

राणा दगबात्तीने बॉलिवूड सिनेमात काम केलं. त्याने बिपाशा बासुसोब आणि अक्षय कुमारसोबततही काम केलं. साऊथच्या चित्रपटातही त्याने आपली वेगळी जागा निर्माण केलीये. त्याचे अक्शन चित्रपट प्रेक्षकांना जास्त आवडतात. नुकतच राणाने लग्नही केलं आहे. त्याचे फोटो खूप व्हायरल झाले होते.

View this post on Instagram

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati)