ranbir and aliya

अभिनेत्री आलिया भट्ट(aliya bhat) आणि अभिनेता रणबीर कपूर(ranbir kapoor) यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या सातत्याने येत आहेत. या दोघांच्या चाहत्यांनादेखील त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे.मात्र हे दोघे इतक्यात लग्न करणार नसल्याचे  समजते.

अभिनेत्री आलिया भट्ट(aliya bhat) आणि अभिनेता रणबीर कपूर(ranbir kapoor) यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या सातत्याने येत आहेत. या दोघांच्या चाहत्यांनादेखील त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे.मात्र हे दोघे इतक्यात लग्न करणार नसल्याचे  समजते.(ranbir and alia marriage)

रणबीर आणि आलिया हल्ली नेहमी एकत्र दिसतात. दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कधीही जाहीर वाच्यता केलेली नाही. परंतु त्या दोघांचे सतत एकत्र असणे, एकमेकांच्या घरी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होणे, बाहेर फिरणे यावरून ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत, अशा बातम्या नेहमी येत असतात. हे दोघेही यावर्षी लग्न करणार आहेत, अशा बातम्या सुरुवातीला आल्या होत्या. परंतु एप्रिल महिन्यात रणबीरचे वडील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यानंतर या बातम्या थांबल्या तर काहींनी त्यांचे लग्न या वर्षाच्या शेवटी होईल, असे म्हटले होते. मात्र यावर्षी त्यांचे लग्न होणार नाही. कदाचित पुढच्या वर्षीदेखील लग्न नसेल.

ऋषी कपूर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे इतक्यात घरात कोणाचेही लग्न होणार नसल्याचे समजते. रणबीर आणि आलिया या दोघांनीही अद्याप लग्नाचा कोणताही विचार केलेला नाही, असे कपूर घराण्यातून सांगण्यात आले आहे.