‘ब्रेकअप जगातील सर्वात वाईट आणि भयानक गोष्ट’, रणबीरबरोबर झालेल्या ब्रेकअपनंतर जवळपास ८ वर्षांनंतर कतरीनाने केला खुलासा!

रणबीर आणि कतरिना यांच्यात २००९ साली 'अजब प्रेम की गजब कहाणी' या चित्रपटादरम्यान मैत्री झाली. पुढे 'राजनीती' या चित्रपटादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

    रणबीरनं आजवर दीपिका पदुकोण, माहिरा खान, नरगिस फाकरी, सोनम कपूर, एंजल जॅक्सन, अवनिता मलिक यांसारख्या अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे तर सध्या रणबीक आलिया भट्टबरोबर चर्चेत आहे. परंतु यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती अभिनेत्री कतरिना कैफची. कतरिनासाठी रणबीरनं थेट सलमान खानशी देखील पंगा घेतला होता. हे भांडण इतकं वाढलं होतं की सलमानला समजवण्यासाठी चक्क ऋषी कपूर मध्ये पडले होते. पण या दोघांच्या ब्रेकअपनंतर सगळ्यांनाच आर्श्चयाचा धक्का बसला.

    रणबीर आणि कतरिना यांच्यात २००९ साली ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ या चित्रपटादरम्यान मैत्री झाली. पुढे ‘राजनीती’ या चित्रपटादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांना अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं जाऊ लागलं. जवळपास सहा वर्ष दोघं लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात होते. परंतु त्यांच्या लग्नाला रणबीरची आई नीतू कपूर यांचा विरोध होता. परिणामी त्यांच्या विरोधामुळं रणबीर आणि कतरिनाच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. आणि दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर कतरिना बराच काळ नैराश्येत होती.

    नुकत्याच एका मुलाखतीत केला उल्लेख

    अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत कतरिनानं आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. “कुणीही असू द्या, जुन्या गोष्टींबाबत माझ्या मनात काहीच नाही. कुणी माझं मन दुखवलंय, असं मला वाटत नाही. प्रत्येकजण स्वत: साठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. ब्रेकअप वाईट आहे. ब्रेकअप या जगातील सर्वात वाईट आणि भयानक गोष्ट आहे. ब्रेकअपमुळे आयुष्यात आता काहीच राहीलं नाही, असं वाटतं”, असं कतरिना म्हणाली होती