रणबीर-श्रद्धाची ‘लव’गिरी लवकरच होणार सुरू…

या चित्रपटांना आता काहीसा दिलासा मिळणार असं चित्र दिसू लागलं आहे. त्यामुळं रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची 'लव'गिरीही लवकरच सुरू होणार आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काहीसा कमी होऊ लागल्यानं राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कडक निर्बंध शिथील करत नवीन नियमांसह नागरिकांना व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली आहे. या लॉकडाऊनचा मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला आहे. प्रदर्शनासाठी सज्ज असलेले चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत, तर ज्यांचं शूट सुरू होतं त्यांना ब्रेक लागला. या चित्रपटांना आता काहीसा दिलासा मिळणार असं चित्र दिसू लागलं आहे. त्यामुळं रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची ‘लव’गिरीही लवकरच सुरू होणार आहे.

     रणबीर आणि श्रद्धा यांची मुख्य भूमिका असलेला दिग्दर्शक लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाच्या शेड्यूलची आखणी करण्यात आली आहे. या चित्रपटाचं तिसरं शूटिंग शेड्यूल खरं तर मे महिन्यात शूट होणार होतं, पण लॉकडाऊननं सर्व घोळ केला. २० जूनपासून चित्रीकरणाला सुरुवात करण्याची योजना लव रंजन यांच्या टीमनं आखली आहे. दिल्ली किंवा उत्तर प्रदेशमध्ये याचं तिसरं शेड्यूल शूट करण्याचा प्लॅन आहे.

     अद्याप अनटायटल असणाऱ्या या चित्रपटात डिंपल कपाडीया आणि बोनी कपूरही दिसणार असून, ते रणबीरच्या आई-वडीलांची भूमिका साकारत आहेत. भारतातील शूट पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरमध्ये युरोपच्या दिशेनं उड्डाण करण्याची निर्मात्यांची योजना आहे.