aalia bhatt with ranbir

रणबीर कपूरची प्रकृती ठीक नसल्याचे आणि त्याला कोराना झाल्याचे वृत्त आले होते. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. आता नीतू कपूर यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला.

    बॉलिवूडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, वरुण धवन, अर्जुन कपूर यांच्यानंतर आता रणबीर कपूरला करोनाची लागण झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. मुंबईवरील कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाहीये. यातच आता बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला कोरोनाची लागण झाली आहे. रणबीरची आई नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत, ही बातमी कन्फर्म केली आहे.

    ‘तुम्ही दाखवलेली चिंता आणि शुभेच्छांसाठी आभार. रणबीरची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे वा नाही, याबाबत मला माहिती नाही. कारण मी मुंबई बाहेर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रणबीर आजारी असून तो आराम करतोय, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. रणबीर कपूरची प्रकृती ठीक नसल्याचे आणि त्याला कोराना झाल्याचे वृत्त आले होते. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. आता नीतू कपूर यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला.

    याआधी रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूरदेखील ‘जुग जुग जियो’ या सिनेमाच्या सेटवरच कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या. याच दरम्यान अभिनेता वरुण धवनही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.  नुकतच आलिया भट्ट, आयान मुखर्जी आणि रणबीर कपूर आगामी सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ च्या सेटवर एकत्र दिसले होते. या सेटवरील फोटो आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. या बातमीनंतर आलीयाच्या चाहत्यां चिंता वाढली आहे.