पुन्हा दीपाबद्दल कार्तिकचा होणार गैरसमज, मालिकेचा प्रोमो रिलीज, बघा नेमकं काय घडलं!

रूपापेक्षा मनाची सुंदरता अधिक चांगली असते.हेच यामालिकेतून दाखविण्यात आलं आहे. कार्तिक आणि दीपाची कथा सांगणारी ही मालिका आहे.

  रंग माझा वेगळा मालिकेत ट्वीस्ट येणार आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. या मालिकेमध्येसुद्धा कार्तिक आणि दीपाच्या आयुष्यात बरेच ट्वीस्ट येत असतात. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढते. मालिकेच्या नवा प्रोमो व्हायरल होतं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  रूपापेक्षा मनाची सुंदरता अधिक चांगली असते.हेच यामालिकेतून दाखविण्यात आलं आहे. कार्तिक आणि दीपाची कथा सांगणारी ही मालिका आहे. या मालिकेमध्ये सध्या दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात गैरसमजाची वादळ येतच आहेत. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा कार्तिकला दीपाबद्दल पुन्हा गैरसमज झाल्याचं दिसून येतं.

  काय आहे प्रोमोत

  दीपा आणि सुजय एका रेस्टांरंटमध्ये आलेले असतात. मात्र रूपाला अचानक कसातरी वास येऊ लागतो. त्यात ती गर्भवती असते. त्यामुळे तिला तो वास सहन होतं नाही. तिला अस्वस्थ वाटू लागतं. ज्यावेळी ती उभ राहायचा प्रयत्न करते. तिला तोल सावरत नाही. आणि नकळत ती सुजयच्या खांद्यावर डोक टेकते. इतक्यात तिथे कार्तिक येतो. ते दृश्य पाहून कार्तिक पुन्हा भडकतो. दीपा आणि सुजयवर संशय घेतो. असं हा प्रोमो व्हायरल होतं आहे.