ranu mondal

कोलकातामधील एका रेल्वे स्टेशनवर रानू मंडल यांनी ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली.

    २०१९ मध्ये रानू मंडल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्या लता मंगेशकर यांचं गाणं गात होत्या. विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडीओ पाहून त्या एका रात्रीत प्रकाशझोतात आल्या होत्या. राणू एका रात्रीत स्टार झाली. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक हिमेश रेशमियाच्या चित्रपटासाठीदेखील गाणी गायली आहेत. डोक्यावर छप्पर नसताना, कुणाचाही आधार नसताना केवळ सुरेल आवाजाच्या जोरावर सोशल मीडियाद्वारे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल सध्या काय करतायेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रानू या इंटस्ट्रीमधून गायब झाल्या. आता रानू यांचा पुन्हा रस्त्यावर गाणे गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    काय आहे व्हिडिओत

    नुकताच रानूचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती जून्याच अवतारात दिसत आहे. यात ती एका गाडीसमोर क्या हुआ तेरा वादा हे गाणं गाताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक प्रतिक्रीया या व्हिडिओवर येत आहेत.

    यूजर म्हणतायत..तिला तिचा उद्धटपणा भोवला आहे. तर काही म्हणतायत आता त्यांना पाहणं आणि ऐकणं कुणालाच आवडत नाहीये. तिसऱ्या एका यूजरने रानू यांची बाजू घेतली आहे. ‘चुका या माणसाकडूनच होतात’ असे म्हटले आहे.