…म्हणून रानू मंडल पुन्हा विपन्नावस्थेत

संगीतकार हिमेश रेशमियाने (Composer Himesh Reshammiya) बॉलिवूडमध्ये (bollywood) गाण्याची संधी दिलेल्या रानूचे दिवस सहा महिने काम नसल्याने पुन्हा फिरले आहेत.

कोलकाता (Kolkata) : पश्चिम बंगालच्या (West Bengal ) नादिया जिल्ह्यातील राणाघाट रेल्वे स्थानकावर (Ranaghat railway station) गाणे (song) म्हणून भीक मागणारी रानू मंडल (ranu mondal) सोशल मीडियामुळे  (social media) एका रात्रीत स्टार झाली होती. पण संगीतकार हिमेश रेशमियाने (Composer Himesh Reshammiya) बॉलिवूडमध्ये (bollywood) गाण्याची संधी दिलेल्या रानूचे दिवस सहा महिने काम नसल्याने पुन्हा फिरले आहेत. कारण ‘तेरी मेरी कहानी’ (teri meri kahani) या हिट ठरलेल्या गाण्यानंतर रानूला पुढे कामच मिळाले नाही.

या ‘रातोकी रानी’ ठरलेली रानू आता उदरनिर्वाहासाठी काम शोधात असल्याचे उघड झाले आहे. कोरोनामुळे स्थानिक संगीताचे कार्यक्रम बंदच झाल्याने रानूचा पैसे कमवण्याचा तोही मार्ग बंद झाल्याने ती मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे.