deepika and ranveer

सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण(Ranveer Singh And Deepika Padukone In Alibaug) हे आता अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे (NA) जागा रणवीर आणि दीपिकाने २२ कोटीला खरेदी केली आहे.

    कोकणातील मनमोहक सागरी किनारे, निसर्ग सौंदर्याची भुरळ कुणाला न पडावी तर नवल. सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण(Ranveer Singh And Deepika Padukone In Alibaug) हे आता अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे (NA) जागा रणवीर आणि दीपिकाने २२ कोटीला खरेदी केली आहे. त्या जागेच्या काही कागदोपत्री कामाच्या पुर्तेसाठी ते आज आलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयात आले होते. यावेळी या जोडीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली.

    खरंतर सिनेसृष्टीमधील सिनेकलाकार नेहमीच आपल्या राहणीमानासाठी सतत चर्चेत असतात त्यांच राहणीमान हे अतीशय उच्च दर्जाच असंत ते सर्वसामान्यांना भुरंळ घालणार असतं मग ते राहत असणाऱ्या मुंबई मधील उच्चभ्रू सोसायटी असो वा सुट्ट्या घालविण्यासाठी त्यांनी घेतलेले रीसॉर्ट. मात्र धकाधकीच्या दुनियेतून बाहेर पडून रिलॅक्स होण्यासाठी शहरापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी आपल्या हक्काचा निवास असावा अशी इच्छा प्रत्येकाची असते.अलिबाग , मुरुड व अन्य पर्यटनस्थळी अनेक अभिनेते, राजकीय मंडळी यांचे फार्म हाऊस, घरे थाटली आहेत. आजकाल सर्व कलाकारांना निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडत आहे. येथील जागेचे भाव गगनाला भिडले आहेत, मात्र निसर्गचा सहवास मिळावा यासाठी ते हवी तेवढी किंमत द्यायला तयार असतात. अशातच आता रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोणने चक्क ९० गुंठे जागाच अलिबागमध्ये घेतली आहे. या जागेत दोन बंगले असून  नारळ सुपारीची बाग असल्याची माहिती मिळाली आहे. या जागेच्या रजिस्ट्रेशनसाठी आज हे पती-पत्नी अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयात आले होते. या दोघांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.