दिग्दर्शकाने कट म्हटलं तरी रणवीर – दीपिका थांबले नाहीत किसींग करतच राहिले, सेटवरच्या व्यक्तीने केला खुलासा!

चित्रपटादरम्यान दोघांनामध्ये जवळीक वाढायला सुरुवात झाली. या चित्रपटात अनेक रोमॅन्टीक सीन आहेत.

  बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. या दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. संजय लीला भन्साली यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटादरम्यानच दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली आहे.

  दीपिका आणि रणवीरच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीपेक्षा त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री सर्वात जास्त गाजली होती. दोघांना पहिल्यांदा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र पाहिले गेले होते. मात्र त्यांना रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा एकत्र आणले ते म्हणजे बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या भन्सालींच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा दीपिका आणि रणवीर यांनी स्क्रीन शेअर केली होती आणि याच चित्रपटादरम्यान दोघांनामध्ये जवळीक वाढायला सुरुवात झाली. या चित्रपटात अनेक रोमॅन्टीक सीन आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

   “अंग लगा दे रे” गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यातील प्रेम सगळ्यांसमोर आलं. त्यावेळी हे दोघे प्रेमात असल्याचे कन्फर्म झाले. या गाण्यातील एक किसिंग सीन खूपच पॅशनेट होता. मी तो सीन अजिबात विसरू शकत नाही. रणवीर आणि दीपिकाचा हा किसिंग सीन शूट होत होता. दिग्दर्शकांनी कट म्हटले पण हे दोघे एकमेकांना किस करत राहिले. त्यावेळी सर्वांना समजले हे दोघे प्रेमात आहेत’ असा खुलासा चित्रपटाच्या सेटवरील एका क्रू मेंबरने केला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

  दीपिका आणि रणवीरला एकत्र आणण्यास संजय लीला भन्साली यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे म्हटले जाते. कारण या कपलने भन्सालींच्या एक नाही तर तीन चित्रपटात एकत्र काम केले. ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, ‘बाजीराव- मस्तानी’ आणि तिसरा ‘पद्मावत’ या चित्रपटात काम केले. आता लवकरच ते पुन्हा एकदा ’83’ चित्रपटात एकत्र झळकणार आहे.