आईच्या वाढदिवसाच्या पार्टीत केवळ बनियनवर रणवीर सिंगचा धम्माल डान्स, नेटकऱ्यांनी मात्र उडवली खिल्ली!

रणवीरने त्याच्या आईसाठी एक पार्टी आयोजित केली होती. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंहने उत्साहाच्या भरात अंगावरचा शर्ट काढून आईसोबत दिल चोरी साड्डा या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय.

  अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे कपल बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कपल आहे. रणवीर सिंग अनेकदा त्याच्या कपड्यांच्या स्टाईलमुळे चर्चेत असतो. नुकताच रणवीरच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यात रणवीर पार्टीचा पुरेपुर आनंद घेताना दिसतोय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Filmfare (@filmfare)

  रणवीरने त्याच्या आईसाठी एक पार्टी आयोजित केली होती. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंहने उत्साहाच्या भरात अंगावरचा शर्ट काढून आईसोबत दिल चोरी साड्डा या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. या गाण्याचा आणि रणवीरच्या डान्सचा सगळेच आनंद घेत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Filmfare (@filmfare)

  आई सोबतच दुसऱ्या व्हिडिओत रणवीर बायको दीपिकासमोर डान्स करतोय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Filmfare (@filmfare)

  तर वडिलांसोबतही रणवीरने खली बली या गाण्यावर डान्स केला आहे.