Ranveer Singh tweeted

कलर्स वाहिनीवरील येणाऱ्या या शोचं नाव ‘न्यू बिग रियालिटी सिरीज’ असल्याचं समजत आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

    बॉलिवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंह आता छोटय़ा पडद्यावर आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तो एका टीव्ही रियालिटी शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

    कलर्स वाहिनीवरील येणाऱ्या या शोचं नाव ‘न्यू बिग रियालिटी सिरीज’ असल्याचं समजत आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हा क्विझ शो असून त्यात १२ राऊंड असतील. हा शो जिंकणाऱ्या विजेत्याला ५ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

    स्पर्धकाला ३ लाईफलाईन मिळतील. एकंदरीत केबीसीच्या धर्तीवर हा शो असल्याची चर्चा आहे. मात्र खरं काय ते शो ऑन एअर झाल्यावरच कळेल. २६ एपिसोडचा हा शो जुलै महिन्यात भेटीला येणार आहे. आता छोटय़ा पडद्यावर रणवीर काय कमाल दाखवतोय हे येणाऱया काळात स्पष्ट होईल. लवकरच रणवीर सिंग ‘सर्कस’ आणि ‘83’ या चित्रपटांत झळकणार आहे. ‘83’ या चित्रपटात तो कपिल देवची भूमिका साकारणार आहे तर दीपिका कपिल देवच्या बायकोच्या भूमिकेत दिसणार आहे.