rasika sunil

अभिनेत्री रसिका सुनील लवकरच(Rasika Sunil To Get Married) लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. रसिकाने आदित्य बिलागीसोबत(Aditya Bilagi) लग्न करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर क्यूट पोस्टद्वारे शेअर केली आहे.

  ‘माझ्या नवऱ्याची बायको’(Majhya Navryachi Bayko) ही मालिका लोकांच्या चांगलीच लक्षात आहे. त्यातही या मालिकेत शनाया(Shanaya Marriage) म्हणून काम केलेल्या रसिका सुनीलचे खूप चाहते आहेत. तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री रसिका सुनील लवकरच(Rasika Sunil To Get Married) लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. रसिकाने आदित्य बिलागीसोबत(Aditya Bilagi) लग्न करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर क्यूट पोस्टद्वारे शेअर केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Aditya Bilagi (@adi_bilagi)

  रसिकाचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीने एक पोस्ट शेअर केली आहे. हीच पोस्ट रसिकाने देखील शेअर केली आहे. यात रसिकाचा लाडका कुत्रा रश दिसत आहे. तिघांनी देखील हातात एक पाटी पकडली आहे. या पाटीवर “माझी माणसं लग्न करत आहेत” असं लिहिण्यात आलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, “जेव्हा रसिका रशला भेटण्यासाठी मला पहिल्यांदा घेऊन गेली तेव्हा तो म्हणाला की माझ्या वयात एका नजरेत कळतं की मुलगा आणि मुलीमध्ये काय सुरु आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला रशची भविष्यवाणी सांगण्याचा विचार करत आहोत.” पुढे आदित्यने “आय लव्ह यू सो मच रसिका हे अधिकृतपणे जाहीर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही” असं म्हंटलं आहे.