‘रात्रीस खेळ चाले -२’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

‘रात्रीस खेळ चाले -२’ ही मालिका झी मराठीवर खूप पाहिली जाते. या मालिकेच्या पहिल्या पर्वाला जसा प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला तसाच तो दुसऱ्या पर्वालाही दिला. मात्र रहस्य आणि थरारपूर्ण ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. झी मराठीवर आता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

‘रात्रीस खेळ चाले -२’ या मालिकेतील व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले. या मालिकेतील शेवंता तर अनेकांच्या आवडीचे पात्र आहे. मात्र ही मालिका लवकरच संपणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार २९ ऑगस्ट रोजी रात्रीस खेळ चाले -२ मालिकेचा शेवटचा भाग दाखविण्यात येणार आहे. या मालिकेचा हा शेवटचा भाग खूप रंजक असणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले -२’ मालिकेच्या जागी ३१ ऑगस्टपासून देवमाणूस ही नवी मालिका १०.३० वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.