
रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घरा घरात पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमाळकर म्हणजेच सर्वांची लाडकी शेवंता. रात्रीस खेळ चाले ही मालिका संपल्यानंतर सगळेच शेवंताला खूप मिस करत होते. पण आता झी झी युवावरील 'तुझं माझं जमतंय' या मालिकेतून पुन्हा एकदा शेवंता प्रेक्षकांच्या भेटीला आली. टेलिव्हिजनवरील तिच्या पुनरागमनामुळे प्रेक्षक आणि चाहते सुखावले आहेत.
रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घरा घरात पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमाळकर म्हणजेच सर्वांची लाडकी शेवंता. रात्रीस खेळ चाले ही मालिका संपल्यानंतर सगळेच शेवंताला खूप मिस करत होते. पण आता झी झी युवावरील ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेतून पुन्हा एकदा शेवंता प्रेक्षकांच्या भेटीला आली. टेलिव्हिजनवरील तिच्या पुनरागमनामुळे प्रेक्षक आणि चाहते सुखावले आहेत.
View this post on Instagram
अपूर्वा झी युवावरील ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेतून पम्मी या नव्या भूमिकेद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि प्रेक्षक तिच्या या भूमिकेवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
तिच्या या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली, “पम्मी हि एक विनोदी व्यक्तिरेखा आहे. ती तिच्या विश्वात जगणारी आहे. सगळ्यांचं छान व्हावं असं तिला वाटतं आणि त्यासाठी ती सगळ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असते आणि सगळ्यांना मदत करण्याच्या नादात ती या मालिकेत गम्मत आणतेय.” तिची व्यक्तिरेखा मालिकेत खरंच धमाल आणतेय आणि तिची नौटंकी प्रेक्षक एन्जॉय करत आहेत.
View this post on Instagram
अपूर्वाने नुकताच मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा पम्मीचा एक हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोवर तिने ‘पम्मी तिथे काय कम्मी?’ असं कॅप्शन लिहिलंय. या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. खरंच पम्मी तिथे मनोरंजनाची कमी हमखास नाही याची खात्री सर्व प्रेक्षक चाहत्यांना आहे.