अण्णा नाईक फक्त रात्रीच दिसणार, मग ते होर्डिंग का असेना, ही भन्नाट आयडीया एकदा बघाच!

‘अण्णा नाईक’ परत येणार, ह्याची चर्चा सर्वत्र झाली. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत अण्णा नाईकांची क्रेझ आहे. म्हणूनच रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या प्रोमोशनसाठी एक नवीन युक्ती वापरली गेली, एक असं होर्डिंग बनवलं गेलं की ते फक्त आणि फक्त रात्रीच दिसेल.

  गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ झी मराठी वाहिनीवरील या मालिकेच्या दोन्ही भागांनी, ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘रात्रीस खेळ चाले २’ने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. आता या मालिकेचा ३ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये प्रॉपर्टीसाठी घरात सुरु असलेले राजकारण, खून प्रकरण हे सर्व काही दाखवण्यात आले होते. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये २० वर्षांपूर्वीची कहाणी दाखवण्यात आली होती. या भागातील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. पण मालिकेच्या शेवटी शेवंता आणि अण्णा यांचा मृत्यू होतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  ‘अण्णा नाईक’ परत येणार, ह्याची चर्चा सर्वत्र झाली. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत अण्णा नाईकांची क्रेझ आहे. म्हणूनच रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या प्रोमोशनसाठी एक नवीन युक्ती वापरली गेली, एक असं होर्डिंग बनवलं गेलं की ते फक्त आणि फक्त रात्रीच दिसेल. जशी काही भूत रात्रीच दिसतात तसेच या होर्डिंगवरचे अण्णा नाईक रात्रीच दिसतात. प्रमोशनच्या अनोख्या प्रकारासाठी याचा उल्लेख नक्कीच केला जाईल.