‘या’ स्त्री मुळे आज अपूर्वा नेमाळेकरचं आयुष्य बदलून गेलं, खरं श्रेय तर ‘त्या’ व्यक्तीचं आहे!

रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तीसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मालिकेच्या सुरुवातीलाच सगळ्या कलाकारांची अर्थात त्यांच्या पात्रांची एंट्री झाली होती. मालिकेत भुताच्या रूपाने का होईना पण अण्णांसोबत ‘शेवंता’ची देखील एंट्री झाली आहे.

    अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले या मालिकेमध्ये शेवंता ही व्यक्तिरेखा साकारुन घराघरात पोहचली. अपूर्वाचा खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे. या अभूतपुर्व यशाचं श्रेय तिनं एका स्त्रीला दिलं आहे. या स्त्रीमुळं अपूर्वाचं आयुष्य रातोरात बदललं. स्वत: अपूर्वाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअऱ करत याविषयी माहिती दिली.

    अपूर्वा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिनं नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन तिच्या आयुष्यातील या स्त्रीचं नाव सांगितलं आहे. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द शेवंताच आहे. होय, याच स्त्री व्यक्तिरेखेमुळंच तिचं आयुष्य बदललं. तिला रातोरात स्टार केलं. अन् यासाठी तिनं शेवंताचे आभार मानले आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.