raveena tondon

रवीना म्हणाली,  सोशल मीडियामुळे लोकप्रियता मिळाली. मला वाटतं हे एक वरदान आहे. मात्र बऱ्याचदा ट्रोल आणि निगेटिव्हीटीमुळे तो एक अडथळा वाटू लागतो.

    अभिनेत्री रवीना टंडनने ९० च्या दशकात तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांवर भुरळ घातली होती. रवीनाने अनेक सिनेमांमधून विविध भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलंय. रवीना सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते. नुकतच रवीनाने एका मुलाखतीत बॉलिवूडमध्ये देखील अनेक निगेटिव्ह लोक असल्याचं म्हटलं आहे. हे लोक निर्माते नाही तर ते कलाकारांना आपल्या तालावर नाचवतात असही ती म्हणाली आहे.

    रवीना म्हणाली,  सोशल मीडियामुळे लोकप्रियता मिळाली. मला वाटतं हे एक वरदान आहे. मात्र बऱ्याचदा ट्रोल आणि निगेटिव्हीटीमुळे तो एक अडथळा वाटू लागतो. आम्हाला अनेकदा अशांचा सामना करावा लागतो. पण निर्मात्यांमध्ये बरीच नकारात्मकता भरली आहे. जे आता निर्माते झाले आहेत आणि अनेक कलाकारांना आपल्या तालावर नाचवत आहेत.

    पुढे सोशल मीडियावरील ट्रोल करणाऱ्यावर बोलताना ती म्हणाली,  मी ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. मी त्यांना माझ्या आयुष्यातून बाजूला काढून टाकलंय आणि हेच उत्तम आहे असं मला वाटतं. माझ्या मते आपण कायम सकारात्मक विचार करणाऱ्यांसोबत राहणं गरजेचं आहे. जे तुमच्यासाठी चांगले आहेत आणि स्वत:साठी देखील.”