रवीच्या ‘बोले नैना’ ला ५६ मिलीयन व्ह्यूज, तुम्ही बघितलं का हे गाणं?

रितेश देशमुखसोबत 'बँजो' वाजवत हिंदी सिनेसृष्टीत दाखल झालेला रवी पुन्हा एकदा हिंदीकडे वळला आहे. रवीनं प्रथमच हिंदी व्हिडीओचं दिग्दर्शन केलं आहे. या व्हिडीओचं शीर्षक 'बोले नैना' असं आहे.

  ‘नटरंग’ चित्रपटाद्वारे अॅड मेकींगकडून सिनेमा दिग्दर्शनाकडे वळलेल्या दिग्दर्शक रवी जाधवनं नेहमीच वेगळ्या धाटणीचे आणि काळाच्या पुढचे चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे. कधी इतिहासात डोकावत, तर कधी भविष्यावर नजर ठेवून रवीनं बनवलेल्या चित्रपटांचं प्रेक्षकांनीही कौतुक केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

  रितेश देशमुखसोबत ‘बँजो’ वाजवत हिंदी सिनेसृष्टीत दाखल झालेला रवी पुन्हा एकदा हिंदीकडे वळला आहे. रवीनं प्रथमच हिंदी व्हिडीओचं दिग्दर्शन केलं आहे. या व्हिडीओचं शीर्षक ‘बोले नैना’ असं आहे. रवीच्या या व्हिडीओला ५६ मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत. रवीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

  अल्पावधीत प्रेक्षकांनी दर्शवलेल्या पसंतीसाठी रवीनं आभार मानले असून, संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे. हा आपल्यासाठी स्पेशल माईलस्टोन ठरल्याचंही रवीनं म्हटलं आहे. सूफीस्कोर या युट्यूब चॅनेलवर जाऊन हे गाणं पाहण्याचं आवाहन रवीनं केलं आहे. ‘सायलेन्स स्पीक’ अशी या व्हिडीओसोबत दिलेली टॅगलाईन बरंच काही सांगणारी आहे.