raveena tondon

दिल्लीतील मालवीय नगर येथे असलेल्या ‘बाबा का ढाबा’चा(baba ka dhaba) एक व्हिडीओ खूप व्हायरल(viral video) झाला होता. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध माणूस व्यवसाय होत नसल्याने रडताना दिसत होता.त्यानंतर अभिनेत्री रवीना टंडनने त्यांचा व्हिडीओ शेअर करत त्यांना मदत करण्यासाठी विनंती केली होती.(raveena tondon`s appeal to help old woman) आता रवीवाने आणखी एका आजींचा व्हिडीओ शेअर केला आहे. या आजींना मदत करा असे रवीनाने सांगितले आहे.

रवीनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एका आजींचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ज्या आजी आहेत त्या गेल्या ३० वर्षांपासून भजी बनवून विकत आहेत. या आजी आसाममधील डुबरीमधील संतोषी मातेच्या मंदिराच्या बाहेर भजी बनवून विकतात. त्यांची मदत करण्याचे आवाहन रवीनाने केले आहे. बाबा का ढाबाप्रमाणे हा व्हिडिओपण लोकांपर्यंत पोहोचवा, असे तिने म्हटले आहे.