शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेला दिलासा , २० सप्टेंबरपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश

अभिनेत्री गेहना वसिष्ठने पॉर्न चित्रपट बनवून ते एका कंपनीला विकल्याचे प्रकरण गाजत असतानाच अभिनेत्री शार्लिन चोप्रानेही अश्लील व्हिडीओची निर्मिती केल्याचे प्रकरण उघडकीस आले. युकेतील एका कंपनीने शार्लिन चोप्रासोबत अश्लील चित्रपट निर्मितीबाबत करार केला होता.

    मुंबई – पॉर्न व्हिडीओची निर्मिती तसेच अश्लील चित्रीकरणात सहभागाप्रकरणी बोल्ड अभिनेत्री शार्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून २० सप्टेंबरपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

    अभिनेत्री गेहना वसिष्ठने पॉर्न चित्रपट बनवून ते एका कंपनीला विकल्याचे प्रकरण गाजत असतानाच अभिनेत्री शार्लिन चोप्रानेही अश्लील व्हिडीओची निर्मिती केल्याचे प्रकरण उघडकीस आले. युकेतील एका कंपनीने शार्लिन चोप्रासोबत अश्लील चित्रपट निर्मितीबाबत करार केला होता.

    पेड कंटेंट असलेल्या या चित्रपटाची पायरेटेड कॉपी निघाली. त्यामुळे अश्लील चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि त्यात अभिनय केल्याप्रकरणी शार्लिनविरोधात मुंबई पोलिसांनी आय.टी. कायद्यांतर्गत ६ नोव्हेंबर २०२० रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तर अभिनेत्री पूनम पांडेविरोधातही मुंबई पोलिसांनी अश्लील चित्राकरणाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

    या दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी दोघींनीही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्या. सारंग कोतवाल यांच्यापुढे शार्लिन आणि पूनम दोघींच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी पार पडली. त्याची दखल घेत खंडपीठाने २० सप्टेंबरपर्यंत शार्लिन चोप्रा आणि पूनम पांडे विरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलीसांना देत सुनावणी तहकूब केली.