सुशांतच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये करण्यात आला महत्वाचा बदल, ‘रिमेंबरींग’चा टॅग झाला अॅड

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने, अकाली निधनाने सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. त्याच्या आत्महत्येमागची कारणे शोधण्यासाठी चौकशी अजून सुरु आहे. टीव्ही मालिकांमधून करिअरला सुरुवात करून

 सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने, अकाली निधनाने सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. त्याच्या आत्महत्येमागची कारणे शोधण्यासाठी चौकशी अजून सुरु आहे. टीव्ही मालिकांमधून करिअरला सुरुवात करून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणाऱ्या सुशांतचा अभिनय प्रवास खूप उल्लेखनीय होता. अत्यंत हुशार, जिज्ञासू वृत्तीच्या सुशांतला विसरणे अनेकांना कठीण जात आहे. दरम्यान इन्स्टाग्रामने सुशांतच्या अकाऊंटमध्ये एक बदल केला आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘रिमेंबरिंग’ असा टॅग इन्स्टाग्रामने अॅड केला आहे. काही खास व्यक्तींच्या निधनानंतरच इन्स्टाग्राम असा अकाऊंटमध्ये बदल करत असते. सुशांत आठवणींच्या रुपात कायम स्मरणात राहील, हेच इन्स्टाग्रामने या निमित्ताने अधोरेखित केले आहे.