remo

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक रमो डिसूझाला ११ डिसेंबरला हृद्यविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या रोमो आयसीयूमध्ये आहे. त्याच्यावर अजिओप्लास्टी करण्यात आलीये. रेमो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी बॉलिवूडमधले अनेक कलाकार प्रार्थना करत आहेत. या दरम्यान रेमोचा रूग्णालयातून एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

View this post on Instagram

A post shared by Liz (@lizelleremodsouza)

रेमोची पत्नी लिजेलने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यात रेमो संगीताच्या तालावर पाय थिरकवताना दिसतोय. पायांनी नाचणे वेगळे आणि हृदयातून नाचणे वेगळे,तुमच्या प्रार्थना आणि आर्शिवादासाठी आभार, असं कॅप्शन या व्हिडिओला दिलय. तुर्तास रेमोचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही रेमो लवकरात लवकर बरा  व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Liz (@lizelleremodsouza)

अमिताभ यांनी ट्विटरवर एका चाहत्याने शेअर केलेला व्हिडिओ रिट्विट केला आहे. हा व्हिडिओ रिट्विट करत त्यांनी रेमो लवकर बरा हो…तू लवकर बरा व्हावा म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो आणि तुम्ही सर्वांनी रेमोसाठी प्रार्थना केली त्याबद्दल तुमचे आभार’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

एका यूजरने ट्विटरवर शेअर केलेला व्हिडीओ हा रिअॅलिटी शोमधील आहे. या व्हिडीओमध्ये स्पर्धकांचा परफॉर्मन्स पाहून रेमो त्यांची प्रशंसा करताना दिसतोय.

दरम्यान रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने रेमोच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. ‘रेमोच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून तो सध्या ठिक आहे’ असे त्यांनी म्हटले होते. रेमोने आजवर अनेक रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम केलय.. ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स प्लस’ आणि ‘झलक दिखला जा’ हे शो आहेत. त्याचबरोबर रेमोने ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’ आणि ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या चित्रपटांच दिग्दर्शन केलय. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमधून रेमोचे नाव चर्चेत आले होते.