remo and salman

काही दिवसापूर्वीच रेमोला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मध्यंतरी त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता रेमोला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तो कुटुंबीयांसोबत ख्रिसमसचं सेलिब्रेशन करत आहे. यामध्येच रेमोच्या पत्नीची लीझेलची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने अभिनेता सलमान खानचे आभार मानले आहे.

View this post on Instagram

A post shared by Liz (@lizelleremodsouza)

सुत्राने दिलेल्या माहितीनुसार लिजेलने रेमोला रूग्णालयात दाखल केल्यानंतर पहिला फोन केला तो सलमान खानला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनूसार लिजेलची अवस्था खूप वाईट झाली होती. काही वेळातच सलमानची संपूर्ण टीम धावून आली. त्यावेळी लिजेल एकटीच होती. तीचा धीर खचत चालला होता. यावेळी सलमान तीला वेळोवेळी कॉल करून धीर देत होता. रेमोच्या प्रकृतीबद्दल तीने तीला आपल्या दोन्ही मुलाला सांगितले नव्हते. त्यावेळी मोठा मुलगा झोपला होता, तर धाकटा मुलगा जीममध्ये होता.

View this post on Instagram

A post shared by Liz (@lizelleremodsouza)

आणि रेमोला वाटलं असिडीटी

रेमोला त्रास होऊ लागला तेव्हा तो ट्रेडमिलवर होता. त्यावेळी त्याच्या अचानक दुखू लागले. यावेळी आपल्याला असिडीटी झाली असल्याचं त्याला वाटलं. त्यानंतर जीना चढताना त्याला उलट्या झाल्या. त्यानंतर लिजेलने त्याला रूग्णालयात हलवले. आणि लगेचच सलमानला कॉल केला.

‘रेस 3’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता सलमान खान आणि रेमो डिसूझा यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटल्यानंतर या दोघांमध्ये भांडणं झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, याविषयी सलमान किंवा रेमोने कोणतंच मत व्यक्त केलं नव्हतं. परंतु, सोशल मीडियावर त्यांच्या भांडणाच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. यामध्येच लीझेलने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये सलमानचे आभार मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Liz (@lizelleremodsouza)