pankaj udhas

पंकज उधास हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक श्रेष्ठ असे गायक आहेत. भारतातील गझलगायन क्षेत्रातील ते महत्वाचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांनी या संगीतप्रकाराला एक वेगळी शैली मिळवून दिली. त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या कलाकारांनी भारतात गझलगायनाला एक नवसंजीवनी मिळवून दिली.

प्रख्यात गझलगायक पंकज उधास यांना ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड २०२०’मध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. उधास यांच्या गायन कारकिर्दीला चाळीस वर्षे झाल्याच्या वर्षीच नेमका हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा असा हा पुरस्कार वीस विभागांमध्ये विविध क्षेत्रांमधील मान्यवरांना प्रदान करण्यात येतो आणि त्यासाठी नामांकने मागविली जातात. उधास यांना जीवनगौरव पुरस्कार विभागामध्ये हा पुरस्कार एकमताने देण्यात आला.

‘इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड २०२०’चे आयोजन एनजी एडयुवायझर प्रायव्हेट लिमिटेड, ब्ल्यू बेरी इंटरनॅशनल ग्रुप यांनी दुबई समूह, केंद्र सरकारची राष्ट्रीय कौशल्य विकास कॉर्पोरेशन, भारतीय महिला आणि बाल विकास महामंडळ मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्यमशिलता मंत्रालय यांच्या सहकार्यातून केले आहे. ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड’ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. जीवनगौरव पुरस्कारांव्यतिरिक्त हे पुरस्कार उद्यमशिलता, बँकिंग, एनजीओ, लेखन, कला, रियल इस्टेट आदी विविध क्षेत्रांमधील अतुलनीय अशा कामगिरीसाठीसुद्धा दिले जातात.

पंकज उधास हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक श्रेष्ठ असे गायक आहेत. भारतातील गझलगायन क्षेत्रातील ते महत्वाचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांनी या संगीतप्रकाराला एक वेगळी शैली मिळवून दिली. त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या कलाकारांनी भारतात गझलगायनाला एक नवसंजीवनी मिळवून दिली. त्यांनी कित्येक अल्बम आणि गाणी ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आहेत आणि आज त्यांना भारतातील एक महान गझलगायक मानले जाते. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे.

‘चिट्ठी आई है’ या ‘नाम’ चित्रपटातील गाण्याने १९८६ साली त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. एका रात्रीत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियता मिळाली. या हिट गाण्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आणि ती अनंत काळापर्यंत रसिकांच्या मनावर गारुड करून राहतील.

पंकज उधास यांच्याकडे गझल लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. हा प्रकार लुप्त होत असताना त्यांनी हे कार्य यशस्वीपणे पार पाडले आहे. आज उच्चरवातील संगीताचा जमाना असतानाही संगीत रसिकांमध्ये गझलची जादू जगभरात कायम ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. शिवाय संगीत कोणत्याही वाद्यातून येणारे नसून ते कलाकाराच्या आत्म्यातून बाहेर पडते, हे त्यांनी सिद्ध केले.