रियाला जामिन मिळू नये यासाठी NCB करतेय प्रयत्न, सर्वेच्च न्यायालयात दाखल केली याचिका!

एनसीबीने अलीकडेच १२ हजार पृष्ठांचे आरोपपत्र दाखल केलय. ज्यामध्ये रिया चक्रवर्ती सह अनेक नाव आहेत. बेकायदेशीर ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे.

  अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीच्या मागच्या अडचणीत वाढ झाली आहे. रियाच्या जामिनाविरूद्ध एनसीबीने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात उघडकीस आलेल्या ड्रग्ज केसमध्ये रियाला जामीनदेण्याच्या मुंबई कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सोमवारी एनसीबीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी १८ मार्चला सुनावणी होणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

  एनसीबीने अलीकडेच १२ हजार पृष्ठांचे आरोपपत्र दाखल केलय. ज्यामध्ये रिया चक्रवर्ती सह अनेक नाव आहेत. बेकायदेशीर ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. हे एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ ए अंतर्गत येते आणि यानुसार किमान १० वर्ष, तर जास्तीत जास्त २० वर्षांच्या तुरूंगवासाची तरतूद आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

  रियाने असेही सांगितले आहे की, सुशांतला गांजा आणि मारिजुआना देण्यात आला होता. आरोपपत्रात असेही लिहिले आहे की, रिया व्यतिरिक्त तिचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि हृषीकेश पवार हे सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्ज खरेदी व पुरवठा करत असत. या क्षणी यापैकी काही आरोपी जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणात अद्याप तपास चालू आहे.