अभिनेत्री रिया चक्रवर्तीला रंगपंचमीच्या दिवशी आली सुशांतची आठवण, सोशल मीडियावर शेअर केला फोटो!

रियाने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिच्यासोबत आणखी एक महिला दिसत आहे. दोघांचे फोटो शेअर करण्याबरोबरच रियाने लेखक रॉबर्ट फाल्घॅम यांचा एक कोटही शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवरून रिया होळीच्या दिवशी सुशांतला मिस करत असल्याचे दिसते आहे.

  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने ती सुशांतची गर्लफ्रेंड असल्याचे जाहीर केले. खुद्द रियाने सोशल मीडियावर याची पुष्टी केली होती आणि सांगितले की, ती सुशांतला बर्‍याच दिवसांपासून डेट करत होती. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाबद्दल बर्‍याच चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या. तिनेच सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केले असावे, असा आरोपही अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी रियावर केला होता.

  View this post on Instagram

  A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

  यानंतर ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला अटकही करण्यात आली होती. ती जवळपास एक महिना तुरूंगात होती. बरं, इतका त्रास सहन करूनही रियाचा तिच्या प्रेमावरील विश्वास कमी झालेला नाही. आजही तिचा तिच्या प्रेमावर विश्वास आहे. एका नवीन सोशल मीडिया पोस्ट मधून तिने तिच्या प्रेमावरचा विश्वास व्यक्त केला आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

  रियाने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिच्यासोबत आणखी एक महिला दिसत आहे. दोघांचे फोटो शेअर करण्याबरोबरच रियाने लेखक रॉबर्ट फाल्घॅम यांचा एक कोटही शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवरून रिया होळीच्या दिवशी सुशांतला मिस करत असल्याचे दिसते आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

  रियाने लिहिले, ‘प्रेम ही शक्ती आहे … प्रेम एक कपडा आहे ज्याचा रंग कधीच फिका होत नसतो. कितीही धुतला तरी त्याची चमक जात नाही.’