रियामुळे सुशांत सिंग राजपूतची बहिण अडचणीत, सर्वोच्च न्यायालयानेही तक्रार मागे घेण्यास दिला नकार!

ही तक्रार रद्द करण्यासाठी सुशांतची बहिण प्रियांका सिंह हिनं सर्वोच्च न्यायालयात दरवाजा ठोठावला. मात्र तिची ही विनंती न्यायालयानं फेटाळून लावली आहे. रिया चक्रवर्तीनं सुशांतचं आर्थिक आणि मानसिक शोषण केलं होतं.

    अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या  मृत्यूला आठ महिने उलटून गेले आहेत. मात्र हे प्रकरण अद्याप शांत झालेलं नाही. सुशांतच्या मृत्यूसाठी सध्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जबाबदार धरलं जात आहे. सुशांतचे कुटुंबीय वारंवार आरोप करत आहेत. त्यानंतर रियाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

    ही तक्रार रद्द करण्यासाठी सुशांतची बहिण प्रियांका सिंह हिनं सर्वोच्च न्यायालयात दरवाजा ठोठावला. मात्र तिची ही विनंती न्यायालयानं फेटाळून लावली आहे. रिया चक्रवर्तीनं सुशांतचं आर्थिक आणि मानसिक शोषण केलं होतं. असा आरोप प्रियांका हिनं केला होता. शिवाय या गुन्ह्यासाठी तिला अटक करावी अशी मागणी देखील ती वारंवार करत होती. दरम्यान हे आरोप रियानं फेटाळून लावले व उलट प्रियांका आणि तिच्या बहिणीविरोधात तक्रार केली. ही तक्रार रद्द करण्यासाठी प्रियांकानं सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु तिथे ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर तिनं थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला तिची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.

    सुशांत प्रकरणात रियाची अद्याप निर्दोष सुटका झालेली नाही. या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. एनसीबीनं न्यायालयासमोर ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः हे आरोपपत्र सादर केलं. या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासोबतच आणखी ३० जणांनी नावं आहेत. शिवाय या प्रकरणी काही ड्रग्ज पेडलर्सला देखील एनसीबीनं अटक केली आहे.