रियाने ड्रग्सबाबत दिली कबुली; बॉलिवूड पार्टींबाबतही केला मोठा खुलासा

अभिनेत्री रिया चक्रवर्तीची नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने चौकशी केली असता आज पहिल्यांदा रियाने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. यापूर्वी रियाने ड्रग्स घेत नसल्याचे सांगत होती. इतकचं नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवुड पार्टींबाबत माहिती दिली.

 मुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीची नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने चौकशी केली असता आज पहिल्यांदा रियाने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. यापूर्वी रियाने ड्रग्स घेत नसल्याचे सांगत होती. इतकचं नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवुड पार्टींबाबत माहिती दिली.

आता एनसीबी ड्रग्स प्रकरणात सुशांतचे सहकलाकार आणि अभिनेत्यांसह २५ बॉलिवूड कलाकारांना समन्स पाठविणार आहे. रियाने एनसीबीला दिलेल्या जबाबात सांगितले की सुशांत सिंह २०१६ पासून ड्रग्स घेत होता.

फिल्म केदारनाथच्या शूटिंगदरम्यान त्याने ड्रग्स घेण्यास सुरुवात केली. तसेच सुशांतच्या सांगण्यानुसार ती ड्रग्स मागवत होती. रियाने ती ड्रग्स घेत नसल्याचे सांगितले, यावेळी तिने सिगारेट आणि दारू पित असल्याचे मान्य केले.