रिया सीबीआय चौकशीस तयार, वकिलांनी दिली प्रतिक्रिया…

रियाने यापूर्वीही मुंबई पोलीस आणि ईडीच्या तपासाला तोंड दिलं आहे, सहकार्य केलं आहे, त्याचप्रमाणे सीबीआयच्या चौकशीलाही ती समोर जायला तयार आहे. तपास कुणीही केला, तरी सत्य हे सत्यच राहणार आहे. त्यात बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया रियाच्या वकिलांनी दिली आहे.

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आज बुधवारी सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे सोपवला आहे. परंतु हा तपास मुंबई पोलिसांकडे न देता सीबीआयकडे दिल्यामुळे अभिनेत्री रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती सीबीआयच्या चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचं वकीलांनी म्हटलं आहे.

रियाने सुरूवातीला सीबीआयकडे तपास द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने घटनेची सत्यता आणि वस्तुस्थिती पाहून, मुंबई पोलिसांच्या तपासाचा रिपोर्ट पाहून हा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तसेच रियाने यापूर्वीही मुंबई पोलीस आणि ईडीच्या तपासाला तोंड दिलं आहे, सहकार्य केलं आहे, त्याचप्रमाणे सीबीआयच्या चौकशीलाही ती समोर जायला तयार आहे. तपास कुणीही केला, तरी सत्य हे सत्यच राहणार आहे. त्यात बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया रियाच्या वकिलांनी दिली आहे.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात दोन राज्य एकमेकांवर राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप-प्रत्यारोप करत होते. याच पार्श्वभूमीवर न्याय होण्याच्या दृष्टिकोनातून ही केस सीबीआयकडे पाठवण्यात आली आहे. भारतीय संविधानाच्या कलम १४२ नुसार सीबीआयला तपास करण्याचा अधिकार आहे, असेही वकील म्हणाले.