ricky martin and marathi actress neha mahajan music album got a grammys nomination
विदेशातही मराठीचाच डंका; अभिनेत्री नेहा महाजन-रिकी मार्टिनच्या म्युझिक अल्बमला ‘ग्रॅमी नॉमिनेशन’

लॅटिन पॉप किंग रिकी मार्टीन व मराठी अभिनेत्री नेहा महाजन यांच्या ‘Pausa’ या म्युझिक अल्बमला भरपूर यश मिळालं आहे. या अल्बमला अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘ग्रॅमी’ पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले आहे. या म्युझिक अल्बमसाठी नेहाने सतारवादन केलं आहे.

नेहा व रिकी यांच्या ‘Pausa’ या अल्बमला सर्वोत्कृष्ट लॅटिन पॉप विभागात नामांकन मिळालं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत नेहाने नामांकनाची मोठी बातमी चाहत्यांना दिली आहे. सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नेहा उत्तम सतारवादक असून तिने तिच्या वडिलांकडून सतारवादनाचे धडे गिरवले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial)

अभिनयासोबतच संगीताचीही आहे आवड

जवळपास गेल्या बारा-तेरा वर्षांपासून नेहा सितारवादनाचे धडे गिरवत आहे. इतक्या वर्षांच्या प्रशिक्षणानंतर तिने सतारवादनात प्रभुत्व मिळवलं आहे. नेहा अनेकदा सोशल मीडियावर सतारवादनाचे व्हिडिओ पोस्ट करत असते.

अशी मिळाली संधी

“म्युझिक अल्बमसाठी जानेवारीत रिकीने मला फोन केला होता. या म्युझिक अल्बममध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत सतारवादन करशील का, असं त्याने मला विचारलं होतं. मी रिकीला शाळेत असल्यापासून ऐकत आले आहे. त्यामुळे मी लगेचच होकार कळवला”, असं नेहाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.